पैठण, (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनानिमित्त पैठण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी पैठण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हसन्नोद्दीन कटयारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,
कार्यकर्ते तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ङ्गभारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भाऊ मुळे. माजी उपनगराध्यक्ष अंबादास ढवळे, माजी नगरसेवक पाशा मंजन, माजी नगरसेवक. तुकाराम लिंबोरे, प्रकाश परदेशी. सय्यद इलियास स्वप्निल साळवे नगरसेवक गौरव आठवले, डॉ. तोफिक पठाण, खाजा कुरेशी अज्जू कट्यारे, अल्ताफ शहा, दिनेश पारीख, बाबू जहागीरदार, गोपीचंद गव्हाणे, मनीष भुसारे, महेश पवार, आशिष पवार, अशोक रोकडे, तोफिक धांडे, मझर पटणी, अझर बागवान प्रमुख उपस्थिती होती.














